गुटख्यानंतर राज्य सरकारने राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी केली असली, तरी राज्याचा डोलारा जेथून चालतो त्याच मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर रोज गुटखा, तंबाखूचा ट्रे गच्च भरताना दिसत आहे. मंत्रालयात कामानिमीत्त येणा-या नागरिकांची मंत्रालयाच्या पोलीस विभागातील कर्मचा-यांकडून तपासणी होते.
त्याच मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पदार्थ होताहेत जप्त
या तपासणीदरम्यान, गावातून येणा-यांसह राजकीय नेत्यांच्या खिशातील गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला जात असून, पोलीस या पदार्थांची विल्हेवाट लावत आहेत. राज्य सरकारचा 100 कोटींचा महसूल बुडाला तरी चालेल, मात्र हा जीवघेणा गुटखा आणि पान मसाला विक्री व सेवनावर 2012 मध्ये बंदी घालण्यात आली होती. 2015 मध्ये डाॅक्टर दीपक सावंत यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदीची घोषणा केली होती. मात्र ज्या मंत्रालयातून हे आदेश काढण्यात आले त्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले जात आहेत.
( हेही वाचा: एसटीच्या तिकीट मशीनचे तीनतेरा; जुन्या तिकीटांचा करावा लागतोय वापर )
तंबाखूजन्य पदार्थांची विल्हेवाट
मंत्रालयात येणा-या नागरिकांच्या तपासणीत सिगारेट, तंबाखूच्या किरकोळ पुड्या सापडतात. त्या तात्पुरच्या जप्त केल्या जातात. अनेक वेळा नागरिक मंत्रालयातून परतताना पुड्या घेऊन जातात, तर उरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे मंत्रालयाच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community