सेना-भाजप यांचे मार्ग वेगळे, तरी मैत्री कायम! संजय राऊतांचे मत

सर संघचालक भागवत यांच्या मतावर शिवसेना सांपूर्ण सहमत आहे. भारतात राहणारे सर्वजण भारतीय म्हणून एकत्र असले पाहिजे. त्यामध्ये धर्माधर्मात भेद राहणे चुकीचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

102

अनेक जण एकत्र असतात पुढे वेगळे होतात, मात्र त्यांच्यात संबंध चांगले असतात. जसे अभिनेता अमीर खान आणि किरण राव वेगळे झाले, पण त्यांच्यात मैत्री कायम असणार आहे. तसेच भाजप आणि शिवसेना यांचे मार्ग वेगळे असले तरी त्यांची मैत्री कायम असणार आहे, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.

सेना-भाजपचा विचार एक! 

भाजपसोबत आमचे शत्रुत्व अजिबात नाही. आमचे रस्ते जरूर वेगळे आहे, मात्र आमचे विचार एक आहेत. भविष्यात आम्ही एकत्र येऊ अगर नाही येणार, हे भविष्य कुणीही वर्तवू शकत नाही. आम्ही स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार हे ५ वर्षे चालेले, त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही संजय राऊत म्हणाले. भाजप आणि शिवसेनेत मैत्री आहे म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार, असा अर्थ निघत नाही. राजकारणातही मार्ग बदलतात मात्र मैत्री कायम असते, असेही राऊत म्हणाले. मागील दोन दिवसांपासून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी युती पुन्हा होईल, त्या अनुषंगाने वक्तव्य केले. त्याआधी संजय राऊत यांची भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत गुप्त बैठक झाली या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप-सेना युती होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे वक्तव्य महत्वाचे आहे.

(हेही वाचाः पावसाळी अधिवेशनात येणार विरोधकांचे ‘वादळ’)

सर संघचालकांशी शिवसेना सहमत!

उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘देशात हिंदू-मुसलमान असा भेदभाव करू नये. हिंदू आणि मुसलमान यांचा डीएनए हा एकच अर्थात भारतीय म्हणून आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले कि, सर संघचालक भागवत यांच्या मतावर शिवसेना सांपूर्ण सहमत आहे. भारतात राहणारे सर्वजण भारतीय म्हणून एकत्र असले पाहिजे. त्यामधे धर्माधर्मात भेद राहणे चुकीचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.