Senate Election : मुंबई विद्यापीठानं रातोरात सिनेटची निवडणूक केली स्थगित

येत्या १० सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती

155
Senate Election : मुंबई विद्यापीठानं रातोरात सिनेटची निवडणूक केली स्थगित

मुंबई विद्यापीठाकडून अचानक सिनेट निवडणुकीला (Senate Election) स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राजकारण तापले आहे. येत्या १० सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती.

रातोरात परिपत्रक काढून या निवडणुकीला (Senate Election) स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाने हे परिपत्रक काढले आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

अचानक निवडणुका (Senate Election) रद्द केल्याने मनसे आणि ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. या निडणुकीसाठी ठाकरे आणि मसने गट उत्सुक होते, त्यांनी तशी तयारी देखील केली होती. ठाकरे आणि मनसे गटासोबतच सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे.

(हेही वाचा –  Talathi Paper Leak : नाशिकमध्ये वॉकीटॉकीद्वारे फोडला तलाठी परीक्षेचा पेपर; एकाला अटक)

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की,”सिनेट निवडणुका (Senate Election) रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत. हे हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे”

तसेच ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरदेसाई म्हणाले की, “मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक (Senate Election) अचानक स्थगित करून टाकली!. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे”.

या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार आपण निवडणूक (Senate Election) रद्द केल्याचे सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.