काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाकडून अचानक सिनेट निवडणुकीला (Senate Election) स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं होतं. पूर्वनियोजित वेळेनुसार १० सप्टेंबर २०२३ रोजी ही निवडणूक होणार होती.
त्यानंतर मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचे (Senate Election) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका आता थेट पुढल्या वर्षी म्हणजेच एप्रिल महिन्याच्या २१ तारखेला होणार आहेत. तर २४ एप्रिल २०२४ ला मतमोजणी होणार आहे. त्यानुसार ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे.
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार?)
पदवीधरांनी फिरवली पाठ
मात्र पदवीधर मतदारांकडून याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. मागील महिनाभरात केवळ ७ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. बहुतांश पदवीधरांनी मतदार नोंदणीकडे पाठ फिरविल्याने या निवडणुकीला (Senate Election) विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विद्यापीठाने निवडणुकीचे (Senate Election) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून ३० ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आता केवळ दोन – तीन दिवस उरले आहेत.
(हेही वाचा – Pro. Anil Nene: अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि सावरकर अभ्यासक अनिल नेने यांचे बँकॉक येथे निधन)
या मतदार नोंदणीकडे पदवीधरांनी पाठ फिरवली आहे. विद्यापीठाने सिनेट निवडणूक रद्द केल्यानंतर शिंदे गटाच्या युवा सेनेसह अभाविप, मनविसे, युवा सेना (ठाकरे गट) यांच्याकडूनही नव्याने जोमाने मतदार नोंदणी (Senate Election) होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सर्वच विद्यार्थी संघटनांकडून मतदार नोंदणीसाठी फारशा हालचाली होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community