Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून बाबा सिद्दीकी राज्यसभेवर? तर भाजपचा चौथा उमेदवार पटेल?

सिद्दीकी यांच्या येण्याने राष्ट्रवादी पक्षातील अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधीची कमतरता भरून निघेल. तर राष्ट्रवादी पक्षातर्फे अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना राज्यसभेसाठी एक स्पर्धक उभा ठाकला असून राष्ट्रवादीकडून सिद्दीकी यांना पक्ष प्राधान्य देईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

372
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून बाबा सिद्दीकी राज्यसभेवर? तर भाजपचा चौथा उमेदवार पटेल?

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) उद्या शनिवारी वांद्रे पूर्वेला, मातोश्रीपासून (near Matoshree) जवळच, शासकीय वसाहतीत (Government colony) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करतील. सिद्दीकी यांच्या येण्याने राष्ट्रवादी पक्षातील अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधीची कमतरता भरून निघेल. तर राष्ट्रवादी पक्षातर्फे अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना राज्यसभेसाठी एक स्पर्धक उभा ठाकला असून राष्ट्रवादीकडून सिद्दीकी यांना पक्ष प्राधान्य देईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Rajya Sabha Election)

सहा खासदारांचा कार्यकाळ संपला

राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत असल्याने त्या जागा रिक्त होत आहेत. यासह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातून शिवसेनेचे (आताचा उबाठा पक्ष) अनिल देसाई (Anil Desai), भाजपचे प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar), नारायण राणे (Narayan Rane) आणि व्ही. मुरलीधरण, काँग्रेसचे कुमार केतकर (Kumar Ketkar) आणि राष्ट्रवादीच्या (आताचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) वंदना चव्हाण या सहा खासदारांच्या जागा रिक्त होत आहेत. (Rajya Sabha Election)

पटेल भाजपचे चौथे उमेदवार?

या सहा जागांपैकी ३ भाजप, आणि प्रत्येकी एक जागा काँग्रेस, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असे निवडून येतील इतके संख्याबळ आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान न होता, मतपत्रिका दाखवून मतदान करावे लागते. त्यामुळे भाजपने चौथा उमेदवार दिलाच तर त्याला काँग्रेसची मते फोडण्यासाठी प्रचंड ‘अर्थ-पूर्ण’ प्रयत्न करावे लागतील. भाजपने काँग्रेस संस्कृतित अनेक वर्षे राहिलेले अमरीश पटेल (Amarish Patel) यांना चौथ्या उमेदवाराची संधी देऊ शकते. तर अन्य सुरक्षित तीन जागांसाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे (Pankaja Munde), नारायण राणे (Narayan Rane), विजया राहाटकर (Vijaya Rahatkar) अशा नेत्यांचा विचार होऊ शकतो. (Rajya Sabha Election)

(हेही वाचा – BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये आता ‘लायब्ररी इन बॅग’, ‘हॅप्पी सॅटर्डे’ संकल्पना राबविणार)

शिवसेनेकडून देवरा जवळपास निश्चित

काँग्रेसमधून (Congress) नुकतेच आयात झालेले मिलिंद देवरा (Milind Deora) यांचे नाव शिवसेना (शिंदे) पक्षाकडून निश्चित झाल्यासारखेच आहे. देवरा यांना दिल्लीला पाठवून शिंदे यांच्या शिवसेनेला निश्चितच त्याचा लाभ होईल. देवरा यांचे अन्य राज्यातील पक्षांशी, नेत्यांशी असलेले संबंध, पक्षाची देश पातळीवर भूमिका काय असावी, तसेच अन्य विषयाबाबत शिवसेनेची भूमिका देशभर पोहोचवण्यास मदतंच होईल. या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला साधारण ४२ मतांची गरज असून शिवसेनेकडे ३९ आमदार आणि अन्य अपक्ष तर राष्ट्रवादीचे ४२ आमदार आहेत. काँग्रेसचे ४५ आमदार असून त्यांचा उमेदवार दिल्लीहून ठरवला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र मुंबईतील माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांचेही नाव चर्चेत आहे. (Rajya Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.