विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य Kalidas Kolambakar यांची नियुक्ती

178
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य Kalidas Kolambakar यांची नियुक्ती
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य Kalidas Kolambakar यांची नियुक्ती

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी ६ डिसेंबर रोजी राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार आहेत. राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी (Speaker of the Maharashtra Legislative Assembly) भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Deputy Chief Minister : ‘उपमुख्यमंत्री’पदाची घटनेत तरतूद आहे का ?)

विशेष अधिवेशनामध्ये (vidhan sabha Adhiveshan) नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल.

याविषयी विचारले असता कालीदास कोळंबकर (Kalidas Kolambakar) म्हणाले की, माझा पक्षाकडून आज मला हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार मी आज दुपारी शपथ घेणार आहे. पुढे विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र मी माझी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे.

9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड होईल.

कालिदास कोळंबकर सलग ९ वेळा आमदार

कालिदास कोळंबकर हे सलग ९ वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. हंगामी अध्यक्ष म्हणून दुपारी १ वाजता कालिदास कोळंबकर हे शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या एकूण २८८ आमदारांना शपथ दिली जाणार आहे. त्यात भाजपाचे १३२, शिवसेना ५७, राष्ट्रवादी ४१, ठाकरे गट २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १० आणि इतर आमदारांना २ दिवसीय अधिवेशनात शपथ दिली जाणार आहे. या आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाईल. मागील वेळी असलेले राहुल नार्वेकर हेच पुन्हा विधानसभा अध्यक्ष होतील असं सांगितले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.