मंत्रालयातील कार्यालय नूतनीकरण होण्याआधीच Manik Kokate यांचे मंत्रिपद जाणार?

97
मंत्रालयातील कार्यालय नूतनीकरण होण्याआधीच Manik Kokate यांचे मंत्रिपद जाणार?
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manik Kokate) यांनी मंत्रालयातील कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू केले असून नवीन कार्यालयात पदार्पण करयापूर्वीच कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अधिसूचना जारी होण्याची शक्यता

आमदार किंवा खासदार यांना न्यायालयाने दोषी मानून दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा सुनावल्यास १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम ८ (३) तरतुदीनुसार संबंधित आमदार-खासदाराचे पद रद्द होते. याबाबत शनिवारी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी कोकाटे (Manik Kokate) यांच्या पदाबाबत अधिसूचना जारी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा – खेळांच्या मैदानांचा खेळांसाठीच वापर व्हावा; Ajit Pawar यांचे निर्देश)

सदनिका लाटल्याचा आरोप

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manik Kokate) व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने १९९५ च्या एका प्रकरणात दोन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी कोकाटे बंधूंवर एक नव्हे तर चार सदनिका लाटल्याचा आरोप आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर वकिलामार्फत तत्काळ जामिन मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आणि न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

तोवर आमदारकी धोक्यात

माणिक कोकाटे (Manik Kokate) यांना जामीन मंजूर झाला असला तरी जिल्हा सत्र न्यायालयाच्या वरच्या न्यायालयात कोकाटे यांच्याविरोधातील निर्णयाला स्थगिती देण्यात आली नाही. जोवर शिक्षेच्या निर्णयाला स्तगिती दिली जात नाही तोवर कोकाटे यांची आमदारकी सुरक्षित नाही, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे आजही कोकाटे यांची आमदारकी आणि पर्यायाने मंत्री पद धोक्यात आहे, असेच म्हणावे लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.