समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले, त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ माजला. राजकीय पातळीवर यावर विरोधही झाला. आझमी यांच्या विरोधात विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यामुळे अबू आझमी यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने आझमी यांना दिलासा देतानाच चांगलीच कानउघडणी केली आहे.
ज्येष्ठ राजकारण्यांच्या कोणत्याही बेजबाबदार वक्तव्याने विधान दंगल भडकू शकते. त्यामुळे आझमी यांनी प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखती देताना संयम आणि सावधगिरी बाळगावी, अशी ताकीद न्यायालयाने त्यांना दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी आझमी यांना मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यात, न्यायालयाने आझमी यांची कानउघाडणी करताना त्यांना संयमाने वागण्याची ताकीद दिली. आझमी (Abu Azmi) यांनी प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखत देताना केलेल्या काही विधानांशी संबंधित हा गुन्हा आहे आणि त्यासाठी पोलीस कोठडी देऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही. तसेच, आझमी हे एक राजकारणी आणि व्यापारी आहेत आणि पळून जाणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन त्यांना अटकेपासून संरक्षण दिले जात आहे. तथापि, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कोणतेही बेजबाबदार विधान दंगली भडकवू शकते आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करू शकते. त्यामुळे, आझमी (Abu Azmi) यांनी प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखती देताना स्वतःवर संयम बाळगण्याची ताकीद आपण त्यांना देऊ इच्छितो, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community