भारतीय जनता पार्टीने अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात महायुतीमधील बच्चू कडू, त्याचबरोबर शिवेसनेचे नेते आनंद अडसूळ यांचा प्रचंड विरोध होता. त्यानंतरही भाजपाने या ठिकाणी राणा यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपची ही सातवी यादी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचे बिगुल आता अखेर वाजलं. (BJP Seventh list)
देशभरात येत्या १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली. दरम्यान बच्चू कडू यांनी व्यक्त केली जात आहे. त्यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा विरोध येथे कायम राहणार आहे. या ठिकाणी प्रहारतर्फे उमेदवार दिला जाणार असल्याचेही कडू यांनी सांगितले.
(हेही वाचा – Sanjay Raut : वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचे दुर्दैव; संजय राऊतांची खंत )
ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सध्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी भाजपाच्या नेत्यांचे आभार मानले. अमरावतीत भाजपाकडून नवनीत राणा विरुद्ध कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे यांची लढत होणार आहे.
हेही पहा –