सध्या चित्रपटसृष्टीतील काही कलाकार हे भेदभावपूर्ण वर्तन करतात, विशेष म्हणजे त्यांच्याकडून हिंदूंचा द्वेष करणारी वक्तव्ये केली जातात, त्यामुळे ते कायम वादात सापडत असतात. म्हणूनच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याविषयी गंभीर आरोप केला आहे. शबाना आझमी, नसरुद्दीन शहा आणि गीतकार जावेद अख्तर हे टुकडे-टुकडे गँगच्या स्लीपर सेलचे सदस्य आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये झालेल्या डझनभर हत्या आणि झारखंडमध्ये एका महिलेला पेटवून देण्यात आल्यानंतरही या घटनांविषयी हे कलाकार का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.
झारखंड येथील हत्येवर मौन का?
झारखंडमध्ये आमच्या मुलीला पेटवून देण्यात आले, त्यावेळी मात्र हे कलाकार अवाक्षर काढत नाहीत, त्यांनी मौन धारण केले. या मनोवृत्तीमुळे अशा कलाकारांची नीच पातळीवरची मानसिकता दिसून येते. भाजपशासित राज्यात अशा काही घटना घडल्या तर अभिनेता नसीरुद्दीन शहाला देशात राहण्याची भीती वाटते. मग ते घाबरून आपला एक पुरस्कार परत करतात आणि अशा घटना भाजपप्रणीत राज्यात घडल्या तर हेच लोक ओरडून सांगायला पुढे असतात, असेही त्यांनी मत व्यक्त केले. त्यामुळे त्यांना सभ्य आणि धर्मनिरपेक्ष का म्हटले जाते यावर चर्चा होणे गरजेचे आहे, असेही गृहमंत्री मिश्रा म्हणाले.
(हेही वाचा अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत मुंबई पोलिसांकडून ट्वीट, कशी असणार वाहतूक व्यवस्था?)
Join Our WhatsApp Community