जम्मू काश्मीरबाबत भारतविरोधी अपप्रचार करणाऱ्या Shabana Mahmood बनल्या ब्रिटनच्या नव्या ‘न्यायमंत्री’

शबाना महमूद (Shabana Mahmood) आणि त्यांच्या सहकारी खासदारांनी पाकिस्तानचा भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्याचे काम केले.

160

युनायटेड किंगडम (यूके) मधील नवीन लेबर पार्टी सरकारने भारत आणि इस्रायलवर अपप्रचार करणाऱ्या शबाना महमूद (Shabana Mahmood) यांची न्यायमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. शबाना महमूद यांच्याकडे लॉर्ड कुलपतीपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. शबाना महमूद या मूळ पाकव्याप्त काश्मीरच्या रहिवासी आहेत. 2010 पासून ते बर्मिंगहॅम लेडीवुडचे खासदार आहेत. पाकिस्तानच्या असल्याने त्या एक दशकाहून अधिक काळ जम्मू-काश्मीर राज्याबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत.

काश्मीरमधून लष्कर मागे घेण्यसाठी आहेत आग्रही 

सप्टेंबर 2014 पासून त्या इंग्लंडमध्ये सातत्याने खासदार आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये, शबाना महमूद (Shabana Mahmood) आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी जम्मू-काश्मीरमधून लष्कर मागे घेण्याची, AFSPA हटवण्याची, दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेल्या लोकांची सुटका आणि कथित सामूहिक कबरींची चौकशी करण्याची मागणी केली होती. शबाना महमूद (Shabana Mahmood) यांच्या या मागण्यांकडे इंग्लंडचा भारतातील हस्तक्षेप म्हणून पाहिले जात होते. याच पत्रात शबाना महमूद यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार जम्मू-काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी केली होती आणि त्यामागचा आपला हेतूही सांगितला होता.

(हेही वाचा Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या वंशजाची बालकबुद्धी!)

भारताच्या अंतर्गत बाबीत परराष्ट्र हस्तक्षेपाची केलेली मागणी 

शबाना यांचा प्रस्ताव पाकिस्तान आणि त्यांची सेना ही संयुक्त राष्ट्र संघावर दबाव टाकण्यासाठी वापर करते. शबाना महमूद (Shabana Mahmood) आणि त्यांच्या सहकारी खासदारांनीही पाकिस्तानचा हा अजेंडा पुढे नेण्याचे काम केले. जानेवारी 2017 मध्ये ब्रिटनचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना महमूद यांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये त्यांनी अनेक खोट्या तथ्यांच्या आधारे भारताची वाईट प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला. या भाषणात त्या म्हणाल्या होत्या की, “भारत – पाकिस्तान हे जगातील सर्वात जास्त लष्करी क्षेत्रांपैकी एक आहे, जेथे दोन अण्वस्त्रधारी शक्तींमध्ये दीर्घकाळ विवाद आहे. जगाकडून याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, ब्रिटनही देत नाही.

कलम 370 हटवल्यानंतरही केलेला आकांडतांडव 

मोदी सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर शबाना महमूद (Shabana Mahmood) यांनी अपप्रचाराचा वेग दुप्पट केला. याबाबत त्यांनी ट्विटरवर लिहिले होते, “मी कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाबद्दल खूप चिंतेत आहे, यामुळे जम्मू-काश्मीरची स्वायत्तता संपुष्टात आली आहे. अलिकडच्या काही दिवसांत भारत सरकारकडून सुरु असलेल्या कारवाया थांबल्या पाहिजेत. मानवी हक्कांचे पालन केले पाहिजे.”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.