‘त्यांनी पाच वर्ष टीव्हीसमोर येऊ नये’, शहाजीबापूंचा राऊतांना झणझणीत टोला

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. हे सर्व आमदार आता राज्यात परतले असून मतदारसंघात त्यांचं जंगी स्वागत होत आहे. या आमदारांमध्ये फेमस झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी पाच वर्ष तरी टीव्हीसमोर येणं बंद केलं पाहिजे असा टोला शहाजीबापूंनी संजय राऊत यांना लगावला आहे.

राऊत सकाळीच भांडायला लावतात

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे सकाळी 10 वाजता टीव्हीसमोर उभे राहतात. आधी त्यांना टीव्हीसमोर उभं करणं बंद करायला हवं. किमान पाच वर्ष तरी संजय राऊत यांनी टीव्हीसमोर बोलू नये. सकाळी-सकाळीच राऊत भांडायला लावतात, अशा शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

(हेही वाचाः ‘काय झाडी, काय डोंगार…’, कसा झाला डायलॉगचा जन्म? खुद्द शहाजीबापूंनी सांगितला किस्सा)

तर मग पवारांकडेच जायचं होतं

संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असताना सुद्धा ते शरद पवार हे या देशाचे नेते असल्याचे म्हणत होते. जर संजय राऊत यांना शरद पवार यांचेच गोडवे गायचे होते तर मग त्यांनी पवारांकडेच जायला हवं होतं, असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here