काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल… शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांचा हा डायलॉग सध्या फारच फेमस झाला आहे. प्रत्येकाच्या तोंडी सध्या हा एकच डायलॉग आहे. शहाजीबापू यांनी स्वतः या डायलॉगचा जन्म कसा झाला हे सांगितलं आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहाजीबापूंनी यामागचा किस्सा सांगितला आहे.
काय झाडी, काय डोंगार…
गुवाहटीत हॉटेलमध्ये असताना सगळे आमदार आपल्या लोकांना फोन करत होते. मग मी माझ्या जुन्या कार्यकर्त्याला फोन केला. बंडखोरीमुळे राज्यात शिवसेनेकडून आमच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत होते. त्यामुळे त्याची माहिती मी त्याच्याकडून घेत होतो. आता माझ्या हॉटेलच्या रुमची खिडकी मोठी होती. त्यातून मी बाहेर बघत फोनवर बोलत होतो.
(हेही वाचाः ‘माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही’, उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांकडे व्यक्त केल्या भावना)
तेव्हा खिडकीतून सहा-सात डोंगर, हिरवीगार झाडी दिसत होती. आता आम्ही दुष्काळी भागातले असल्यामुळे मला ते सगळं वातावरण बघून खूप छान वाटत होतं. म्हणून तेच मी त्याला फोनवरुन सांगितलं आणि तोच फोन कॉल इतका व्हायरल होईल असं मला वाटलंही नव्हतं, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. फोनवरच्या माझ्या या संभाषणात राजकीय काही नसल्यामुळे माझा हा फोन कॉल व्हायरल झाला असेल, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे.
Join Our WhatsApp Community