Shaikh Hasina पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार; कुणी केला दावा, वाचा…

93

बांगलादेशात अराजक माजवून तत्कालीन पंतप्रधान मंत्री शेख हसीना (Shaikh Hasina) यांना देश सोडून पळून जावे लागले होते. त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली. मात्र आता बांगलादेशात युनूस सरकारच्या विरोधात संघर्ष वाढू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे युनूस यांची खुर्ची धोक्यात येऊ लागली आहे. त्यामुळे त्यांची आता पाकिस्तान आणि चीनसोबत वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. त्यातच बांगलादेशाची सूत्रे पुहा एकदा शेख हसीना (Shaikh Hasina) घेतील, असा दावा करण्यात आला आहे.

(हेही वाचा मातोश्रीबाहेर पुन्हा एकदा Shiv Sena ची बॅनरबाजी करत राजकीय धुळवड)

शेख हसीना (Shaikh Hasina) यांचे जवळचे सहकारी आणि अमेरिका अवामी लीगचे उपाध्यक्ष डॉ. रब्बी आलम यांनी हा मोठा दावा केला. शेख हसीना लवकरच बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परत येतील. यासोबतच, शेख हसीना यांना सुरक्षित आश्रय आणि प्रवासाचा मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. रब्बी आलम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, शेख हसीना (Shaikh Hasina) बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परत येतील. तरुण पिढीने चूक केली आहे, पण ती त्यांची चूक नाही, त्यांना दिशाभूल करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून हस्तक्षेपाची मागणी केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.