अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डीजे वाजवल्याशिवाय राहणार नाही, असे मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Sushma Andhare)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणपती विसर्जन मिरवणूक, डीजे यामुळे होणाऱ्या प्रदूषण आणि त्रासावरती भाष्य केलं होतं. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. कोणाच्यातरी नातवाला त्रास होतो त्यावेळी काही जण दुपारी उठून बोलतात इतर वेळीही त्यांनी बोलावं अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. या टीकेला आता मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना पत्र लिहून उत्तर दिले आहे. (Sushma Andhare)
(हेही वाचा – 26/11 : आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याची प्रतीक्षाच; अमेरिकेतील कोर्टात काय झाल्या घडामोडी )
यावर आता शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारे यांना थेट इशारा दिला आहे. अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डीजे वाजवल्याशिवाय राहणार नाही, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या. (Sushma Andhare)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community