प्रणिती शिंदेंची (Praniti Shinde) काँग्रेसमधून हकालपट्टी करून त्यांची खासदारकीसुद्धा रद्द करावी, अशी मागणी उबाठा गटाचे नेते शरद कोळी यांनी केली आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने शरद कोळी यांनी संताप व्यक्त केला आहे. कारण याच मतदारसंघातून उबाठा गटाचे अमर पाचील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशावेळी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या काडादी यांना पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांना खडेबोल सुनावत शरद कोळींनी (Sharad Koli) काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
शरद कोळी (Sharad Koli) म्हणाले की, गद्दार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) चा घात करत आहेत. त्यांनी मविआचा घात केला आहे. त्यामुळे मविआच्या सर्व नेत्यांनी ताबडतोब त्यांची हकालपट्टी करण्यासाठी पावले उचलावीत. तसेच प्रणिती शिंदे यांची खासदारकीसुद्धा रद्द करावी. एकीकडे शिवसेना उबाठाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या जीवावर निवडून येतात आणि दुसरीकडे गद्दारी करतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी असतानाही प्रणिती शिंदेंचा (Praniti Shinde) प्रचारसभेत सहभागी झाले होते.
( हेही वाचा : समंथा IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर)
त्यावेळी ह्यांनी उद्धव ठाकरेंचे बुट पुसवण्याचे काम केले. पण त्यांना याची जाण राहिलेली नाही. प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) भाजपाची सुपारी घेतली असून त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे खासदारकी मिळवण्यासाठी भाजपाने त्यांना मदत केली. त्यामुळेच इथे त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला. पण आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमचाच उमेदवार निवडून येणार, असा टोला ही कोळी (Sharad Koli) यांनी शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर लगावला.
याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले?
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी दोनदा विजयी झालो. हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. मात्र कधीतरी एकदाच त्यांचा उमेदवार इथून निवडून आला आणि त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ स्वत:च्या नावावर केला. पण हे चुकीचे आहे. त्यामुळेच दक्षिण सोलापूरमध्ये आम्ही धर्मराज काडादी यांना मतदान करण्यासाठी आलो होतो. तरी त्यांची चुक आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे,” असे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community