राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल! शरद पवारांचा आत्मविश्वास 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.  

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हे सरकार आज पडेल उद्या पडेल, असे तर्क लढवले जात असताना आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच हे सरकार भक्कम असून, राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल, असा व्यक्त केला. १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन साजरा करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर सत्तांतराबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागल्या होत्या, त्याला पवारांनी पूर्णविराम दिला.

(हेही वाचा : कोणतेही ओळखपत्र नसलेल्यांचे लसीकरण कसे करणार? उच्च न्यायालयाकडून विचारणा )

नेमके काय म्हणाले पवार?

  • आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो, असे कोणला पटले नसते. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला.
  • तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्यारितीने काम करत आहे.
  • सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र सरकार ५ वर्ष टिकेल.
  • शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही; पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे.
  • ज्यावेळी जनता पक्षाचे राज्य आले, त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला…तो म्हणजे शिवसेना.
  • नुसता पुढे आले नाही, तर या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेनेने एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही, असा निर्णय घेतला.
  • पक्षाचा नेताच असा निर्णय घेतो, त्याच्या परिणामांची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही.
  • त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवून पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली, तरी शिवसेनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली, तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल, तर तसे होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here