पुण्यातील बाणेर येथे शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची शुक्रवारी (१० नोव्हेंबर) भेट झाली. यावेळी पवार कुटुंबातील बहुतेक सर्वचजण उपस्थित होते. तर दिवाळीनिमित्त भेट झाली असल्याची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी गोविंदबागेमध्ये पाडव्याचा निमित्ताने पवार कुटुंबीयांची दिवाळी ही एकत्र होत असते. पण यावेळी घरातच दोन गट निर्माण झाल्यामुळे गोविंदबागेत पाडव्याला कोण कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे. या भेटीमुळे एकंदरच राजकीय तर्क वितरकांना चांगलेच उधाण आले आहे. (Sharad Pawar & Ajit Pawar Meet )
गेल्यावेळी रक्षाबंधनाला एकत्र येण्याचे अजित पवारांनी टाळले होते. परंतू, अजित पवार हे शरद पवारांसोबत पुण्यात पवार कुटुंबाच्या दिवाळी स्नेहभोजनाला एकत्र आले होते. काका-पुतण्यामधील आलेले वितुष्ट दिवाळी दूर करते का, असा प्रश्न उपस्थित होत असताना प्रतापराव पवारांच्या घरी नेमके काय घडले ते शरद पवारांची बहीण सरोज पाटील यांनी बाहेर पडताना सांगितले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली का असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता सरोज पाटील यांनी कुटुंबाच्या गप्पा रंगल्या होत्या, असे सांगितले. आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. नेहमीप्रमाणे सर्वजण एकत्र आले होते. एकमेकांची मजा, मस्करी, गप्पा रंगल्या होत्या असे त्यांनी सांगितले. (Sharad Pawar & Ajit Pawar Meet )
(हेही वाचा : Halal Free Diwali : दिवाळीची खरेदी करताय, सतर्क रहा…)
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली होती. यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. सायंकाळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. भेटीवेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
दरम्यान, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबियांनी काय करावे हे त्यांचा मुद्दा आहे. त्याबद्दल मी काय बोलणार ? मी पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे. पार्टीबद्दल काही असेल तर बोला. कोणी कोणाला भेटावे याबद्दल मी काय बोलू, असं जयंत पाटील म्हणाले.
हेही पहा –