Sharad Pawar Ajit Pawar Meet : कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी येवो; शरद पवार यांच्या दिवाळी शुभेच्छांमध्ये ‘त्या’ भेटीचा संदर्भ

Sharad Pawar Ajit Pawar Meet : आयुष्यात प्रतीवर्षी काही दिवस असे असतात की, या संकटाचं विस्मरण करुन कुटुंबासोबत काही दिवस घालवावेत, जगावं अशा प्रकारची इच्छा असते. अशी इच्छा प्रदर्शित करण्याचा दिवस हा आजचा दिवाळीचा दिवस आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी दिवाळी शुभेच्छा दिल्या आहेत.

146
Lok Sabha Election 2024 : पवार काका-पुतणे उमेदवारांची यादी जाहीर करत नाहीत

महाराष्ट्रात पवार कुटुंबाची दिवाळी खास असते. (Sharad Pawar Ajit Pawar Meet) बारामतीतील गोविंदबागेत एकत्र येऊन पवार कुटुंबियांच्या अनेक पिढ्या दिवाळी साजरी करतात. पक्षाचे अनेक कार्यकर्ते या वेळी नेत्यांच्या भेटी घेतात. यंदा पक्षात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पुण्यात प्रताप पवार यांच्या घरी साजरी करण्यात आली आहे.

या वेळी झालेली अजित पवार आणि शरद पवार यांची भेट ही अख्ख्या महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय ठरली. काका-पुतण्याच्या या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यातच भर म्हणून शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी संध्याकाळी थेट दिल्ली गाठली. (Sharad Pawar Ajit Pawar Meet)

(हेही वाचा – ICC Suspends Sri Lanka Cricket : आयसीसीकडून श्रीलंकन क्रिकेट मंडळ निलंबित, सरकारी हस्तक्षेपामुळे कारवाई)

अजित पवार दिल्लीत गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी गेले. त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोघांमध्ये या वेळी सुमारे दीड तास चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याही दिवाळीच्या शुभेच्छा चर्चेत आल्या आहेत.

कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी येवो

शरद पवार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही जनतेला शुभेच्छा देणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे. “उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुढील 2-3 दिवसांमध्ये लोक उत्साहाने सण साजरा करतात. मी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीचा सण आनंदाने जावो, त्यांच्या व्यक्तीगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी येवो. पुढच्या आयुष्याचा जो काही कार्यक्रम त्यांनी आखला आहे त्यामध्ये यावर्षी भरभरुन यश येवो, अशाच शुभेच्छा मी या प्रसंगी व्यक्त करतो,” अशा शब्दांत शरद पवार यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Sharad Pawar Ajit Pawar Meet)

(हेही वाचा – Indrayani River Pollution : पवित्र इंद्रायणी नदी कि हिमनदी; प्रशासनाविषयी व्यक्त होतोय संताप)

या व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी अजित पवार आणि इतर कुटुंबियांची भेट घेतल्याचाही संदर्भ दिला आहे. “सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. अडचणी असतात. वेळेप्रसंगी काही संकटांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. पण आयुष्यात प्रतीवर्षी काही दिवस असे असतात की, या संकटाचं विस्मरण करुन कुटुंबासोबत काही दिवस घालवावेत, जगावं अशा प्रकारची इच्छा असते. अशी इच्छा प्रदर्शित करण्याचा दिवस हा आजचा दिवाळीचा दिवस आहे,” असं शरद पवार म्हणाले. या विधानामधून त्यांनी राजकीय मतभेद विसरून आपल्या कुटुंबियाची भेट घेतल्याचे अधोरेखित केले आहे. (Sharad Pawar Ajit Pawar Meet)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.