शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स; पण उद्धव ठाकरे नाही; Devendra Fadnavis यांचा दावा

122
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून आतापासूनच दावे – प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. अशा वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोण असणार हे फिक्स आहे. पण त्यामध्ये उद्धव ठाकरे मात्र निश्चित नाही, असे मत फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी मांडले

महाविकास आघाडी उद्धव यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून केव्हाच घोषणा करणार नाही. उलट काँग्रेसने टेबल सर्व्हे करून ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)   यांनी शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत विरोधकांच्या या आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा चिमटा काढला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी 3 दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. त्यांनी यासाठी आपल्या स्वतःच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यांनी 3 दिवस सोनिया गांधींशी चर्चा केली. पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही.

(हेही वाचा आक्रमक मुसलमानांना शांत करण्यासाठी हिंदु युवकाला मृत घोषित करावे लागले; Bangladesh पोलिसांचे स्पष्टीकरण)

दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या हाती काहीही लागले नाही. आता शरद पवार यांनीही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर ठरवला जाईल, असे ठणकावून सांगितले आहे. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांची री ओढली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात जे होते, ते आता होताना शक्य दिसत नाही. पण माझ्या मते, शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे हे जवळपास फिक्स झाले आहे. त्यांच्या डोक्यात 3-4 चेहरे आहेत. पण त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नक्कीच नाही, असेही फडणवीस  (Devendra Fadnavis)   म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.