राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना जाहीररीत्या फटकारल्या नंतर पार्थ पवार प्रचंड नाराज असून, वडील अजित पवार यांनी मात्र या सर्व प्रकरणावर मौन धारण केले आहे. मला कुणाशीही काही बोलायचे नाही. मला माझे काम करायचे आहे असे अजित पवार पत्रकांरांनी विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालेत. मागील काही दिवसांपासून पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार नाराज असल्याचे तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, पार्थ पवार यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, पवार कुटुंबातील मतभेद मिटणार की याला वेगळं वळण मिळणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारले जात आहेत.
काय आहे नेमका वाद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर खुद्द अजित पवार, पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार प्रचंड नाराज झाल्या होत्या.
Join Our WhatsApp Community