जेव्हा विकासाचा मुद्दा येतो तेव्ह नितीन गडकरी राजकारण बाजूला ठेवून सहकार्याची भूमिका घेतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कौतुक केले.
नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. नांदेडमध्ये गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाचे उद्घाटन यावेळी शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवारांनी ऊसाच्या संदर्भातही वक्तव्य केले. शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने ऊसाची तोडणी करावी, यांत्रिकीकरणचा अवलंब करावा, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शन मोडमध्ये! राज्यभर दौरा करणार)
घरातील सगळ्यांनी शेतात काम करणे यावर विचार केला पाहिजे. पर्याय शोधला पाहिजे. आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही पवार यावेळी म्हणाले. नांदेडच्या गोदावरी काठी गुरुगोविंद सिंगांचे वास्तव्य होते. त्यामुळे नांदेडचा लौकिक आहे. अगोदर गोदावरी, गुरुगोविंद सिंग यांच्यामुळे, MGM शिक्षणसंस्थेमुळे आणि आता गोदावरी बँकेमुळे लौकिक वाढेल, असेही पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community