- खास प्रतिनिधी
मुंबईतील ३६ विधानसभा जागांवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उबाठाची ‘हाणामारी’ सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) वाट्याला केवळ दोन मतदारसंघ देऊन बोळवण केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
तोडगा निघणे कठीण
महाविकास आघाडीत मुख्यत्वे विदर्भ आणि मुंबई या विभागातील जागावाटापावरून रस्सीखेच आहे. विदर्भातील ६२ पैकी ४५ जागा आणि मुंबईतील ३६ पैकी १५-१७ जागा काँग्रेसला हव्या आहेत. शिवसेना उबाठानेही त्या जागांवर दावा केल्यामुळे चर्चेतून लवकर तोडगा निघणे कठीण आहे. (Sharad Pawar)
(हेही वाचा – आता MSRTC च्या शिवनेरीमध्ये दिसणार ‘सुंदरी’)
उबाठाचा २२-२३ वर दावा
शिवसेना उबाठा गटाचा जीव मुंबईत असल्याने उबाठाला मुंबईतील ३६ पैकी २२-२३ जागा हव्या आहेत. त्यामुळे काँग्रेस-शिवसेना उबाठा यांच्यातील वादात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागणार आहे, अशी शक्यता आहे. या दोन जागांमध्ये अणुशक्ती नगर आणि घाटकोपर पूर्वचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
ठाकरे यांनी राष्ट्रवादी संपवली
मुंबईमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी राहिली असली तरी आघाडीच्या अन्य मित्र पक्षांच्या मदतीने पक्ष वाढवण्यास वाव आहे. काही वर्षांपूर्वी सचिन अहिर यांनी मुंबई शहर भागात विशेषतः वरळी भागात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले होते, पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडून येण्यासाठी कोणतेच आव्हान राहू नये म्हणून अहिर यांना पक्षात घेतले आणि तिथेच राष्ट्रवादीचे मुंबई शहरात अस्तित्व संपुष्टात आले. अणुशक्ती नगरचे आमदार नवाब मालिक हेदेखील पक्ष फूटीनंतर अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आणखी अडचण झाली.
(हेही वाचा – सेवा शुल्कात कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई; Aditi Tatkare यांची माहिती)
मुंबईच्या बदल्यात पश्चिम महाराष्ट्र
त्यामुळे मुंबईतील ताकद ओळखून शरद पवार गटाने महाविकास आघाडीत ज्या जागा मिळतील त्यावर समाधान मानण्याचे धोरण अवलंबले असून मुंबईच्या बदल्यात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र भागात जागा वाढवून मागण्यावर भर राहणार असल्याचे समजते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community