Sharad Pawar गटाकडून चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या सुपूत्राला उमेदवारी

58
Sharad Pawar गटाकडून चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या सुपूत्राला उमेदवारी
Sharad Pawar गटाकडून चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या सुपूत्राला उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहे. अशातच उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस बाकी असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाने पक्षाच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाच्या या यादीत ७ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (Sharad Pawar)

( हेही वाचा : थांबा, विचार करा आणि मग कृती करा; Digital Arrest विषयी पंतप्रधानांनी केली जागृती

राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक्सवर ही यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये माण विधानसभेतून प्रभाकर घार्गे, काटोलमधून सलील अनिल देशमुख, खानापूर विधानसभेतून वैभव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त वाईमधून अरुणादेवी पिसाळ, दौंडमधून रमेश थोरात, पुसदमधून शरद मेंद आणि सिंदखेडामध्ये संदीप बेडसे यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याआधी तीन याद्या जाहीर करत केल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत शरद पवार गटाने एकूण ८३ उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे.(Sharad Pawar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.