शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत!

156

राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. शिवसेनेचे कधीच काँग्रेसशी जुळणार नाही आणि दोन्ही काँग्रेस या कधीच एकत्र येणार नाही. कारण मुळामध्ये राष्ट्रवादीचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असे धक्कादायक विधान शिवसेनेचे नेते, माजी खासदार अनंत गीते यांनी केले आहे.

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाही! 

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना गीते यांनी थेट मते मांडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. आघाडीचे नेते आघाडी सांभाळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे. उद्या आघाडी तुटलीच, तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असेही अनंत गीते यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा : आता राज्यपालांच्या आणखी एका स्वाक्षरीची ‘प्रतीक्षा’!)

दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही!

मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. त्यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मत नव्हते, दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एक विचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असे अनंत गीते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.