मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एका व्यासपीठावर येत एकमेकांचे कौतुक केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या हीरक महोत्सव सोहळ्याला ते हजेरी लावतील.
रविवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा हीरक महोत्सव सोहळा रंगणार आहे. त्यासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लांबा आणि सरचिटणीस ए श्रीकुमार सुद्धा उपस्थित असतील, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली.
( हेही वाचा: शक्तिप्रदर्शनानंतरही बच्चू कडू यांना राज्य मंत्रिपद; भरत गोगावलेंना महामंडळावर समाधान मानावे लागणार? )
दुसऱ्या दिवशी भारत जोडो यात्रेला जाणार
या कार्यक्रमात पुन्हा एकदा राजकीय फटकेबाजी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताला नांदेडला जाण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community