‘तो’ पक्षाचा निर्णय नाही-शरद पवार

174

कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात, ज्यांच्यासोबत जायचे आहे त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे, हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात गेली दोन दिवस एमआयएमबाबत ज्या बातम्या येत आहेत. तो पक्षाचा निर्णय नाही, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त करत ‘एमआयएम’सोबत जाण्याची शक्यता फेटाळली. गोविंद बाग येथे ते पत्रकारांशी पवार बोलत होते.

( हेही वाचा : काँग्रेसचे पदाधिकारी भाजपच्या दारी )

पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न लवकर मार्गी लागावा

यावेळी पुरंदर विमानतळाबाबत पवार पुढे म्हणाले, एक जागा जवळपास निश्चित झालेली आहे. त्याला जवळपास सर्व विभागांनी मान्यता दिली आहे. त्या जागेच्या बाबत संरक्षण खात्याची काही मते आहेत. ती विमानतळाच्या बाबत दुर्लक्षित करता येत नाहीत. त्यामुळे यासंबंधीचा निर्णय घेण्यात आलेली यंत्रणा सध्या थांबली आहे. राज्याच्या दृष्टीने पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न लवकर मार्गी लागावा असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संरक्षणमंत्री आणि संबंधित विभागातील यंत्रणांसोबत राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन निर्णय घ्यावा. आमचा हा आग्रह आम्ही दिल्लीत जाऊन करणार आहोत. असेही पवारांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.