इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांचं सरकार जनतेने पाडलं; जनता सुजाण आहे,धडा शिकवते पवारांचा भाजपला टोला

129

प्रत्येक धर्म हा कोणाचा द्वेष करा अस सांगत नाही. धर्म बंधुभाव, विकास सांगतो. आज देशामध्ये वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. देशात महागाई खूप वाढत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये अराजकता माजली आहे. जनता हे सगळं पाहत असते. आणीबाणीनंतर इंदिरा गांधीचं सरकार पडलं होतं. मोरारजी देसाई यांचं सरकार जनतेने पाडलं होतं. जनता सुजाण आहे. नेते चुकल्यावर धडा शिकवते, असं म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ते गुरुवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे अत्यंत निंदनीय कृत्य

 काश्मीर फाईल्स, काय आहे काश्मीर फाईल्स? काय प्रकार आहे? काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. शेजारील देशाला तो मान्य नाही. तो देश अतिरेकी संघटना शक्ती देऊन काश्मीरमध्ये हिंदू, मुस्लिमांवर हल्ले करण्याचे काम करतो. ज्या – ज्या वेळी हे हल्ले झाले त्यावेळी दुर्दैवाने तिथल्या लोकांना वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. या काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम यांच्यावर जे हल्ले झाले त्या काळामध्ये देशाचे राज्य, केंद्र सरकारमधील राज्य भाजपच्या मदतीचे होते आणि तोच विचार आज काश्मीरच्या नावाने लोकांच्यामध्ये एक प्रकारचं संघर्षाच वातावरण झालं पाहिजे याची काळजी घेतली जात आहे. हे अत्यन्त निंदनीय कृत्य आहे, असे शरद पावर म्हणाले.

( हेही वाचा:राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )

राज्य प्रगत करायचे असेल तर…

छत्रपती शिवाजी यांनी सांगितलं, सामान्य माणसाला संघटित करू, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य हे भोसल्याच म्हणून कोणी ओळखत नाही, ते हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जात. रयतेच, सामान्य माणसाचं राज्य असा हा आदर्श शिवाजी महाराज यांनी दिलास आहे. काही लोक जात आणि धर्माच्या माध्यमातून द्वेष माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला द्वेष नको, आम्हाला भांडण तंटा नको, आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला महागाईमधून सुटका पाहिजे, तरुणांना रोजगार कसा मिळेल हे पाहायचे आहे. देश, राज्य प्रगत कसा होईल?  ही स्थिती निर्माण करायची आहे. ते करायचं असेल तर धार्मिक, भाषिक, यांची एकता अत्यंत गरजेची आहे, असही मत पवारांनी व्यक्त केलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.