छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपाधीवरून सध्या महाराष्ट्रात वाद पेटला आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले. त्यामुळे राज्यात वाद पेटला आहे. अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन सुरु झाले आहे. अशा वेळी शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर दोन्ही होते, असे म्हणत अजित पवारांचे म्हणणे खोडून काढले.
छत्रपती संभाजीराजे यांना काहीजण त्यांचे काम म्हणून स्वराज्यरक्षक म्हणून उल्लेख करत असतील तर त्याला माझी काही तक्रार नाही. काही घटक आता धर्मवीर म्हणून उल्लेख करत असतील आणि फक्त ते धर्माच्या अँगलने विचार करत असतील तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे. हे मांडण्याचा त्याला अधिकार आहे. ज्याला धर्मवीर म्हणायच आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी ते म्हणावे. राज्यात धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षकवरुन वाद नको. महापुरुषांवरुन अकारण वाद नको, मी अजित पवार यांचे वक्तव्य टीव्हीवरच पाहिले आहे. राज्यात लोकांचे प्रश्न डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर बोलणे टाळले.
(हेही वाचा उर्फी जावेद वाद; चित्रा वाघ म्हणाल्या, राजकारण नको, हा विषय सामाजिक!)
काय म्हणाले होते अजित पवार?
हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community