राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाषण करताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नसल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली. पवारांच्या हस्ते उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
काहींना सत्ता गेल्यापासून करमत नाही
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल आहे. पण त्यांनी दोन कार्यक्रमात वक्तव्य केले. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य नसल्याने त्यांच्याकडून अशी विधाने होतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी कोश्यारी यांच्यावर नाव न घेता टीका केली. राज्यपालांनी अशी वक्तव्ये केल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे, लोक म्हणतात यांच्या नादाला न लागणे बरे, असा टोलाही पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला. तसेच काही लोकांना सत्ता गेल्यापासून करमत नाही निवडणूक निकाल लागण्याआधीच मी येणार मी येणार, असे सांगत होते पण त्यांना आम्ही काय येऊ देतो, अशी मिस्कील टीका पवार यांनी हातवारे करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
(हेही वाचा रात्रीच्या वेळेस सुरू होणारे ‘बेस्ट’ बसमार्ग दिले कंत्राटदारांना?)
Join Our WhatsApp Community