राज्यात ईडीच्या वाढत्या कारवायांवर काय म्हणाले शरद पवार? वाचा…

रिझर्व्ह बँकेचे नागरी सहकारी बँकांबाबतचे नवीन धोरण पाहता देशातून नागरी सहकारी बँका बंद करण्याचे कारस्थान रिझर्व्ह बँकेचे आहे, असे शरद पवार म्हणाले.

86

जिथे गैरव्यवहार झाला असेल, त्यासाठी आपल्या देशात कमिशन आहेत. त्याच्याकडे तक्रार केली जाऊ शकते. राज्य सरकारचे गृह खाते आहे. राज्याची स्वतःची स्वतंत्र तपासाची यंत्रणा असताना ईडीने त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे हे एका अर्थाने राज्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे. याची अनेक उदाहरणे हल्ली ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी मला योग्य वाटत नाही. जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होईल, तेव्हा या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

भावना गवळींना ईडी देते त्रास!

गेल्या दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचे नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. ईडीने अनिल देशमुख, भावना गवळी, प्रताप सरनाईक, संजय राऊत, अनिल परब यांना त्रास दिला आहे. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे. पण तिथेही ईडीने जाऊन त्यांना त्रास देत असल्याचे त्याने सांगितले असल्याचे पवार म्हणाले.

(हेही वाचा : मुंबईतील ‘ही’ रेल्वे स्थानके होणार विमानतळासारखी!)

नागरी सहकारी बँका बंद करण्याचे कारस्थान!

रिझर्व्ह बँकेचे नागरी सहकारी बँकांबाबतचे नवीन धोरण पाहता देशातून नागरी सहकारी बँका बंद करण्याचे कारस्थान रिझर्व्ह बँकेचे आहे, रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. विशिष्ट लोकांच्या हाती सूत्रे देऊन सहकार क्षेत्र संपविण्याचा घाट केंद्राकडून सुरू असल्याचाही घणाघात हल्ला पवार यांनी केला.

भागवतांच्या वक्तव्याने ज्ञानात भर!

हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. त्यामुळे प्रत्येक भारतीय आम्ही हिंदूच मानतो, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना भागवत यांच्या वक्तव्याने आपल्या ज्ञानात भर पडली, अशी खोचक टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.