Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर

सुप्रिया सुळे बारामतीतून तीन वेळा खासदार राहिल्या आहेत. तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीतून सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

174
Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बारामतीची लढत विशेष ठरणार आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : कसली रे कोयता गँग, सुपडाच साफ करतो; अजित पवारांनी दिली तंबी)

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या सभेत शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) नावाची घोषणा केली. या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की,

“निवडणूक आयोग १४ किंवा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. निवडणुका आपल्या देशाचे भविष्य ठरवतील. देशाच्या भविष्याची इतकी चिंता आजवर कोणालाही नव्हती, पण आता बदलाची गरज आहे. आज पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे लक्ष देत नाहीत. त्याऐवजी ते केवळ गुजरातवर लक्ष केंद्रित करत आहेत. तसेच सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे.” (Supriya Sule)

(हेही वाचा – Ram Naik यांना पद्मभूषण म्हणजे सच्च्या मुंबईकराचा सन्मान – आशिष शेलार)

‘मोदी की गॅरंटी’वर शरद पवारांची टीका :

‘पंतप्रधान मोदी आम्हाला काय हमी देत आहेत? काळा पैसा परत आलेला नाही आणि कोणतेही काम केले जात नाही. आज शेतकरी आंदोलन करत आहेत, पण पंतप्रधान मोदी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या देशात महागाई आणि बेरोजगारी ही एक गंभीर समस्या बनली आहे.”

‘तुतारी’ बटण दाबा :

शरद पवार पुढे म्हणाले की, जर तुम्हाला वाटत असेल की परिस्थिती नियंत्रणात असली पाहिजे, तर ती वेळ आता आली आहे. जेव्हा तुम्ही मतदान करण्यासाठी जाल, तेव्हा ‘तुतारी’ बटण दाबा. ‘आज मी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची घोषणा करतो. सुप्रिया सुळे बारामतीतून तीन वेळा खासदार राहिल्या आहेत.

(हेही वाचा – मॅगसेसे पुरस्कार विजेते कर्करोगाच्या रुग्णांचा देवदूत Viswanathan Shanta)

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीतून सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.