शरद पवार यांच्या कार्यकाळात ४० वर्षांत, तर उद्धव ठाकरे यांच्या काळात अडीच वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिले नाही. (Jalna Maratha Andolan) उलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिले, ते तुम्हाला सुप्रीम कोर्टात टीकवता आले नाही. काल शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. ज्या ठिकाणी मराठा बांधवांचे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी गेले, तर त्यांना तेथील ग्रामस्थांनी नाकारले. तुम्ही केवळ राजकारण करत आहात. काल पवारसाहेब गावात गेल्यावर लोकांनी त्यांच्यावर अर्वाच्च भाषेत विधान केले. जे मी या मंचावर सांगूदेखील शकत नाही. लोकांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. तुम्ही आज आरक्षणाची गोष्ट करत आहात; पण तुमच्या ४० वर्षांच्या काळात तुम्ही एकदा तरी आरक्षणाविषयी शब्द उच्चारला आहे का ? तुम्ही 40 वर्षे कुठे होतात ? आरक्षणाच्या मुद्द्यावर काय बोलतात ?, असा घणाघात गिरीश महाजन यांनी शरद पवारांवर केला. बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले.
(हेही वाचा – Jalna Maratha Andolan : शरद पवारांना ‘तो’ अधिकार नाही – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका )
लोकांना देखील कळाले आहे की, तुमचा हेतू काय आहे. राजकारण तथा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या ठिकाणी गेला आहात; पण लोक तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. वास्तविक ही घटना घडायला नको होती; परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. सरकारला उपोषणकर्त्यांचा जीव वाचविणे महत्वाचे होते. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या जीवाचे बरेवाईट होण्याचा धोका होता, त्यामुळे त्यांचे उपोषण सोडविणे महत्वाचे आहे. (Jalna Maratha Andolan)
विरोधकांना एवढा कळवळा आत्ताच का ?
लाठीहल्ल्याची घटना दुर्दैवीच आहे; परंतु मराठा समाजासाठी काहीही न करणाऱ्या विरोधकांना एवढा कळवळ आताच कसा आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, शरद पवार गेली ५० वर्षे सत्तेत होते, त्यांनी आरक्षण दिले नाही. उलट ते म्हणाले होते, मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे ? त्यांच्या त्या वक्तव्याची माझ्याकडे क्लीप आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडीच वर्षे सत्तेत होते, त्यावेळी त्यांनीही आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही. त्या वेळी ते कधीही घराच्या बाहेर निघाले नाहीत. आता आंदोलकांना भेटायला निघाले आहेत. यांचे प्रेम हे पुतनामावशीचे आहे. (Jalna Maratha Andolan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community