राज्यात विधानसभा (Assembly Election 2024) निवडणुकीच्या प्रचार सभांची सोमवारी, १८ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे. तत्पूर्वी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे लालबाग येथे बोलत असताना पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. फोडाफोडीचे राजकारण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) जन्मानंतर चालू झाले आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. (Raj Thackeray)
लालबाग येथे बोलत असताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे. मात्र या हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम हे प्रामुख्याने शरद पवारांनी (Sharad Pawar) केले आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. शरद पवार यांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले. तुमचे मित्र, तुमचा परिवार महाराष्ट्रात जिथे कुठे असतील तिथे त्यांना सांगा किमान यातून तरी आता आपण महाराष्ट्र बाहेर काढू. मी माझ्या अनेक सभांमधून सांगितले उद्या मनसे असो, शिवसेना असो, भाजपा असो, कॉंग्रेस असो, एनसीपी असो हे सगळे पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा – तिवसा मतदारसंघात ‘मविआ’त बिघाडी; शरद पवार गट ब्लॅकमेल करत असल्याचा Yashomati Thakur यांचा आरोप)
पुढे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, महाराष्ट्राचा राजकारण हे बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडसारखं होऊ नये. तसेच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे घाण आणि भीषण स्वरूपातील आहे. हे सर्व प्रकरण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला आहे. महाराष्ट्रातला एकोपा, आमच्या संतपरंपरा, आमच्या संतांनी दिलेली शिकवण एकत्र राहण्याची शिकवण, सगळं विसरून चाललोय आपण. का? यांच्या स्वार्थी राजकारणासाठी करतोय. असे राज ठाकरे म्हणाले. तसेच आपल्या शेवटच्या प्रचार सभेत बोलताना शिवडी विधानसभा मतदारसंघात (Shivdi Assembly Constituency) भाजपा आणि शिवसेना आमच्या बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना पाठिंबा दिल्याने मी त्यांचे आभार मानतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
हेही पाहा –