राष्ट्रवादीकडून पक्षातील सर्व विभागांची कार्यकारिणी बरखास्त

150

सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पक्ष बांधणीवर भर दिला आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे दौरे सुरू झाले असून, आता राष्ट्रवादीने राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभागांची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवारांच्या आदेशाने कारवाई

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरद्वारे त्याबाबत माहिती दिली. अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महिला काँग्रेस, राष्ट्रीय युवा काँग्रेस आणि राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचा त्यात समावेश नसेल. त्याचप्रमाणे हा निर्णय महाराष्ट्र किंवा अन्य राज्यातील विभागांना लागू राहणार नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

लवकरच नवीन नियुक्त्या

दरम्यान, या पदांवर लवकरच नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. बरखास्तीचे पत्र सर्व विभाग आणि सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पाठवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.