नव्या संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. आज संसदेत पार पडलेले कार्यक्रम पाहून मी तेथे गेलो नाही याचे आणखी समाधान वाटत आहे, अशा शब्दात पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवारांनी या कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, सकाळी मी हा कार्यक्रम पाहिला. तो पाहिल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो नाही याचे आणखी मला समाधान वाटत आहे. त्याचे कारण ज्या लोकांची तिथे उपस्थिती होती आणि जे काही धर्मकांड सुरू होते ते पाहिल्यानंतर अधुनिक भारताची संकल्पना जी जवाहारलाल नेहरूंनी मांडली, ती आणि सध्या जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे पवार म्हणाले आहेत.
पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटत आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी अधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली आज जे चाललंय ते याच्या नेमके उलट सुरू असल्याचे शरद पवार म्हणाले.
(हेही वाचा Central Vista : राजदंडापुढे पंतप्रधान मोदींचा दंडवत)
Join Our WhatsApp Community