- सुजित महामुलकर
मंदिरे आणि धार्मिक स्थळांना अपवादानेच भेटी देणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी ९ सप्टेंबरला ‘लालबागचा राजा’ मंडळाला भेट दिली आणि बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत नात रेवती सुळे यादेखील होत्या. पवार कुटुंबात अनेक नवनवीन चेहेरे राजकारणात येत असल्याने आता रेवतीच्या रूपात आणखी एक सदस्य राजकारणात येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
उच्चशिक्षित रेवती
२६-वर्षीय रेवती या शरद पवार (Sharad Pawar) यांची कन्या सुप्रिया सदानंद सुळे यांची कन्या असून ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून सार्वजनिक प्रशासन विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
मुंबईच्या गणेशोत्सवाचं वैभव गिरणगावात पाहायला मिळत. आज कुटुंबीयांसह इथल्या लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतलं. बळीराजाच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याचं बळ मिळो, अशी लालबागच्या राजाचरणी प्रार्थना केली. pic.twitter.com/X8AYS62RxY
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 9, 2024
(हेही वाचा – Haryana मध्ये काँग्रेस – आप आघाडीत फूट; ‘आप’ने जाहीर केली २० उमेदवारांची यादी)
रेवती गावागावात
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) यांची कन्या सुप्रिया विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा असा नणंद-भावजयचा सामना झाला. त्यावेळी प्रचारात पवार कुटुंबाने मोठ्या पवारांच्या पाठीशी उभे रहात सुप्रिया यांच्यासाठी प्रचार केला. अगदी अजित पवार यांचे बंधू तसेच भावजय, पुतण्या युगेंद्र आणि भाची रेवती यांनीदेखील प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आणि सुप्रिया यांना मतदान करण्याचे आवाहन केले. रेवती या प्रचारात गावागावात फिरून प्रचार करताना सामान्य मतदारांनी पाहिले. शरद पवार यांची नात असल्याने रेवतीना बघायला लोकांची गर्दी होत असे.
(हेही वाचा – Congress Leader विजय वडेट्टीवार यांच्यासाठी विधानसभा निवडणूक कठीण)
राजकारणात रस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगात सुनावणी दरम्यानही रेवती या सुप्रियासोबत आयोगाच्या कार्यालयात दिसल्या होत्या, असे सांगण्यात आले. रेवती यांचे मोठ्या पवारांशी अत्यंत चांगले बॉंडिंग असल्याने आजोबांच्या काळजीपोटी त्यांनी प्रचारात हिरीरीने भाग घेतला होता. तसेच गेल्या काही दिवसात रेवती या राजकारणात अधिक रस घेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ तसे रेवती या भविष्यात राजकारणात येण्याची शक्यता अधिक आहे, असे बोलले जाते. मात्र नजीकच्या भविष्यात म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला की आणखी काही काळ राजकीय अभ्यास आणि अनुभव घेऊन प्रवेश करतात, ते लवकरच कळेल. (Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community