भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांच्या मुलीला महिला अध्यक्ष पद देण्याच्या हालचाली शरद पवार गटात सुरू झाल्या आहेत. त्यासाठी विद्यमान अध्यक्ष विद्या चव्हाण यांना नारळ दिला जाणार असल्याचे कळते.
राष्ट्रवादीतील बंडानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीचे महिला अध्यक्षपद दिले जाणार आहे. त्यासाठी पवारांच्या एकनिष्ठ विद्या चव्हाण यांना बाजूला केले जाणार आहे. सध्या चव्हाण राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आहेत.
शरद पवार हे लवकरच जळगावमध्ये सभा घेणार आहेत. या सभेच्या नियोजनाची जबाबदारी खडसेंनी घेतली आहे. या सभेत मुक्ताईनगरच्या संभाव्य उमेदवार म्हणून रोहिणी खडसे यांना प्रमोट केले जाणार आहे. यानिमित्ताने कन्येच्या पुनर्वसनाचा प्रयत्न खडसेंकडून केला जाणार आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : नीति आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’)
बीडला उपाध्यक्षपद –
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात दाखल झालेल्या बीडच्या बबन गित्ते यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची लढत होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community