Sharad Pawar सर्वोच्च न्यायालयात; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर पक्षावरील अधिकाराबाबत निवडणूक आयोगात सहा महिन्यांहून अधिक काळ सुनावणी सुरू होती. दहापेक्षा अधिक सुनावणींनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला.

263
Sharad Pawar सर्वोच्च न्यायालयात; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हाण देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना देण्याचा निर्णय नुकताच दिला होता. (Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर पक्षावरील अधिकाराबाबत निवडणूक आयोगात सहा महिन्यांहून अधिक काळ सुनावणी सुरू होती. दहापेक्षा अधिक सुनावणींनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Sharad Pawar)

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांच्या धारावीतील सभेला मुस्लिम जमले की जमवले)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाविरोधात मंळवारी शरद पवार (Sharad Pawar) गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत या याचिकेत लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी संध्याकाळी वकील अभिषेक जेबराज यांच्यामार्फत वैयक्तिक पातळीवर ही याचिका दाखल केली. अजित पवार (Ajit Pawar) गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. या प्रकरणी विरोधकांनी दाखल केलेल्या कोणत्याही याचिकेवर त्यांचीही सुनावणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. (Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.