एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोनवरून पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली.
Prime Minister Shri Narendra Modi ji called to enquire about my health. I am thankful for his concern and good wishes.@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
अखेर पवारांना कोरोनाने गाठलेच
कोरोनाच्या मागील दोन लाटेत अनेक राजकीय नेत्यांना लागण झाली होती. मात्र शरद पवार याला अपवाद ठरले होते. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरीच राहिले, परंतू पवार यांनी अनेक दौरे केले, पण, तरीही त्यांना कोरोना स्पर्शही करू शकला नाही. मात्र आता तिसऱ्या लाटेत शरद पवारांना कोरोनाने गाठले. दुपारीच शरद पवार यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून पवारांच्या तब्येची चौकशी केली. पंतप्रधान मोदी सध्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकी प्रचारात व्यस्त आहे, याही व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधानांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली.
(हेही वाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना, ट्वीट करून म्हणाले…)
रोहित, पार्थ पवार भावनिक
दरम्यान, पवारांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांचे नातू भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आजोबा… काळजी घ्या, असे आवाहन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केले.
आजोबा
काळजी घ्या
तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल https://t.co/2sEEiLlYBm— Parth Pawar (@parthajitpawar) January 24, 2022
तर आमदार रोहित पवार यांनीही ट्वीट करत पवारांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’ असे भावनिक ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Communityआजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय.
पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो!तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!#getwellsoon@PawarSpeaks
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 24, 2022