अजित पवारांची ‘ती’ ओरड निरर्थक, Sharad pawar यांचा दावा

399
Assembly Election : भाजपामधील नाराजांच्या नाराजीचा शरद पवार गट फायदा उचलणार

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भाजपबरोबर गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षाबरोबरच आहेत, असा दावा शरद पवार (Sharad pawar) यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना केला आहे. सातपैकी चार टप्प्यांमधील मतदान प्रक्रिया पार पडल्यावर मोदींना मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याचे जाणवत आहे. विशेषत: शेतकरी आणि तरुण वर्ग भाजपच्या विरोधात गेला आहे. हे मोदींच्याही निदर्शनास आले आहे. यामुळेच हिंदू-मुस्लीम असा प्रचाराला धार्मिक रंग दिला. ‘भटकती आत्मा’, ‘नकली शिवसेना’ असा वैयक्तिक पातळीवर मी किंवा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. ही सारी भाजपची पीछेहाट होत असल्याची लक्षणे आहेत. असे मत पवारांनी (Sharad pawar) व्यक्त केले.

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : मुंबईत चोख बंदोबस्तात मतदान, ४० हजार पोलिसांचा फौजफाटा मतदानाच्या दिवशी तैनात)

अजित पवारांच्या बंडाविषयी बोलताना शरद पवार (Sharad pawar) म्हणाले, “सत्ताधारी पक्षाबरोबर गेले पाहिजे ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये भावना होती. हे पाच वर्षे सत्तेविना होते. पुन्हा विरोधात बसण्याची या नेतेमंडळींची मानसिकता नव्हती. याशिवाय काही नेतेमंडळींच्या मनात तुरुंगात जावे लागेल अशी भीती होती. माझ्याशी या नेत्यांनी चर्चा केली होती. तुम्हाला वेगळा मार्ग स्वीकारायचा असेल तर जरूर जा, पण मी तुमच्या बरोबर येणार नाही हे आधीच स्पष्ट केले होते.” असे पवारांनी सांगितले. (Sharad pawar)

अजित पवारांची ओरड निरर्थक

“राष्ट्रवादीत माझ्यावर अन्याय झाला अशी भावना अजित पवार (Ajit Pawar) आता व्यक्त करीत आहेत. ‘मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर’ वगैरे भाषा करीत आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही. अजित पवारांना पक्षाने काय कमी दिले ? उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदे दिली. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होते. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे साऱ्या राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे.” असं शरद पवार (Sharad pawar) म्हणाले आहेत.

प्रफुल्ल पटेल भाजपकडे जाण्यासाठी तेव्हापासून आग्रही

प्रफुल पटेल (Praful Patel) २००४ पासूनच भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते. मी काही राजकीय चुका केल्या, असे ते म्हणतात, पण भाजपने २००४च्या निवडणुकीत ‘इंडिया शायनिंग’चा प्रचार सुरू केला तेव्हापासूनच पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी माझ्याकडे आग्रही होते, असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad pawar) यांनी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.