Sharad Pawar : शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण आणि शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोचण

351
वक्फ कायदा सुधारणेला शिवसेना उबाठाचा विरोध, हिंदुत्वाच्या भूमिकेवर BJP चा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सर्व जण बारामतीमध्ये एक शासकीय कार्यक्रमाला जात आहेत. त्याआधीच शरद पवार (Sharad Pawar) यांनी या तिघांना त्यांच्या निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील स्वतः हे निमंत्रण द्यायला आले. त्यानंतर हे तिघे जेवायला जाणार का, अशी चर्चा आता रंगू लागली असतानाच भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून यावरून उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोचण दिले आहे.

काय म्हणाले आशिष शेलार? 

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले, म्हणूनच बारामतीतून भोजनाचे आमंत्रणाचे पत्र आलेय. याबाबत निर्णय काय होईल तो होईल पण…मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा वारंवार हे परंपरा जतन करीत आले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सगळी राजकीय घराणी ही परंपरा वर्षोनुवर्षे जतन करीत आली आहेत. फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप-बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करुन टाकली!

त्यांचा नारा एकच..
मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी !
पेग, पेग्वीन, पार्टीसाठी कमला मिल बरी!!

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.