उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघे भाजपाबरोबर जातील. शरद पवारांचीही गॅरंटी मी देत नाही. काही कारण काढून ते भाजपाबरोबर जातील. नाविन्य त्यात काहीच नाही. शरद पवार सेक्युलर आहे हे खोटे बोलत आहेत. ते संधीसाधू आहेत. त्यामुळे ते सेक्युलर असल्याचे आम्ही मानत नाही. उद्धव ठाकरे धर्मवादी आहेत हे उघड आहे. काँग्रेसचे आणि त्यांचे पटले नाही. एनसीपीचा त्यांना काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना भाजपाबरोबर जाणं भाग आहे, असा तर्क वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचवा आणि अखेरचा टप्पा जवळ आला आहे. येत्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी महासभा आणि रोड शो करण्यावर भर दिला आहे. ही रणधुमाळी अत्यंत शिगेला पोहोचलेली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी एक मोठा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर हे टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते.
राजकीय भूकंप होणार
या प्रसंगी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जातील. त्यांच्यामागे चौकशीचा सिसेमिरा आहे. शिवाय त्यांना राजकीय पुनर्वसन करून घ्यायचे आहे. त्यामुळे त्यांना भाजपासोबत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. तर, शरद पवार हे संधीसाधू राजकारणी आहेत. तेही भाजपासोबत जातील, असा दावा आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.
भाजपा 250 पर्यंत पोहचणार
2014 आणि 2019 मध्ये भाजपा 70 ते 72 टक्क्यांवर निवडणुका घेऊन गेले होते. ते आता 50 आणि 60 टक्क्यांवर आले आहे. मतदान कमी झाले आहे याचा फटका भाजपाला बसणार आहे. आता ते 400 पार नव्हे 250 पर्यंत आलेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community