वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी विधानपरिषदेच्या तोंडावर मोठा आरोप शरद पवारांवर केला आहे. त्यांनी शरद पवारांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Underworld don Dawood Ibrahim) दुबईत भेटल्याचा दावा केला आहे. शरदचंद्र पवार गटाचे गटप्रमुख शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊद इब्राहिमला भेटले होते. तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ते आरोप करत नसून काही तथ्य समोर ठेवत आहेत. असे प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी सांगितले. (Sharad Pawar)
काय आहे आरोप?
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगितले की, शरद पवार 1988-1991 दरम्यान मुख्यमंत्री होते. त्या दरम्यान शरद पवार भारतातून लंडनला गेले. तेथून कॅलिफोर्नियाला त्यांनी 2 दिवस मुक्काम केला. तिथे त्यांनी एक बैठकही घेतली. ही बैठक कुणासोबत झाली? हे स्पष्ट झाले पाहिजे. शरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची दुबईत भेट घेतल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. या बैठकीला केंद्र सरकारने मान्यता दिली होती का, असा सवाल आंबेडकरांनी केला.
(हेही वाचा – Love Jihad : आशिक अन्सारीने केले हिंदू तरुणीचे अपहरण आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती)
तपशील जाहीर करावा – प्रकाश आंबेडकर
शरद पवार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim) यांच्या भेटीला केंद्र सरकारची मान्यता नसेल, तर मुख्यमंत्री म्हणून तो अहवाल केंद्र सरकारला दिला होता की नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. या सगळ्याचे रखवालदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) असल्याचे आंबेडकर म्हणाले. ही भेट झाली की नाही याचा तपशील प्रकाशित करा. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) पुढे म्हणाले की, यात कोणत्याही एका पक्षाचा संबंध आहे, असे मी म्हणत नाही. मात्र यामुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
(हेही वाचा – २०१७ च्या सीएम फेलोशिपचा लाभार्थी बनला आयएएस अधिकारी; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, हा तरुण….)
बाबा सिद्दिकीची हत्या ही सुरुवात आहे- आंबेडकर
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बाबा सिद्दीकी यांची हत्या ही एक सुरुवात आहे. सध्याची परिस्थिती 1990-2000 मध्ये होती तशीच आहे. ही परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाऊ नये, म्हणून निवडणूकीच्या वेळी ही बाब मतदारांना समजून घ्यावी. यासाठी मी आवाज उठवत आहे. तसेच या सगळ्याचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय, असे आंबेडकर म्हणाले. 1990 मध्ये जी परिस्थिती दिसली होती तीच पुन्हा दिसून येत आहे. याचे कारण काहीही असले तरी केंद्र सरकारने ते शोधले पाहिजे. आंबेडकर म्हणाले की, मी फक्त कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलत नाही तर देशाच्या सुरक्षेबद्दल बोलतो आहे. (Sharad Pawar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community