Sharad Pawar आणि दाऊद यांची दुबईत भेट; प्रकाश आंबेडकरांआधी कुणी केला होता दावा?

197
Sharad Pawar आणि दाऊद यांची दुबईत भेट; प्रकाश आंबेडकरांआधी कुणी केला होता दावा?
Sharad Pawar आणि दाऊद यांची दुबईत भेट; प्रकाश आंबेडकरांआधी कुणी केला होता दावा?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचे अंडरवर्ल्ड डॉन  याच्याशी संबंध असल्याचा दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) दावा पुन्हा एकादा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलेय. त्यांनी दि. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, १९८८-९१ मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) भेट घेतली होती.

( हेही वाचा : झारखंड मध्ये NDA चे शिक्कामोर्तब; भाजपा ६८, तर इतरांना दहा जागा

त्यांनी प्रश्न केलाय की, त्यावेळी तत्कालीन केंद्र सरकारने पवारांना (Sharad Pawar) दाऊदच्या भेटीची परवानगी दिली होती का? जर तशी परवागनी दिली असेल तर केंद्र सरकारने त्याचा रिपोर्ट जाहीर करावा. तसेच भेटीला केंद्राची परवानगी होती तर परदेशातून परत आल्यावर पवारांनी (Sharad Pawar) रिपोर्ट केंद्राकडे सोपावला होता का? असा सवाल ही प्रकाश आंबेडकरांनी केलाय.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी हा प्रश्न उपस्थित केला कारण महाराष्ट्रात पुन्हा एकदा सन १९९० सारखी परिस्थिती निर्माण होत आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांड ही फक्त सुरुवात आहे. या हत्येमागे काय कारण आहे? हे केंद्र सरकराने शोधायला हवे, असे ही ते म्हणाले.

पूर्व रॉ अधिकाऱ्याने ही केला होता दावा

शरद पवार (Sharad Pawar) आणि दाऊदमधील संबंधांबद्दल दावा होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी पूर्व रॉ अधिकारी एन.के सूद यांनी सांगितले होते की, राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांचा दाऊदशी (Dawood Ibrahim) संबंध आहे. पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या जवळकीमुळे दाऊद देशातून पळून जाण्यास यशस्वी ठरला. त्याव्यतिरिक्त दाऊदला पकडण्यासाठी जे गुप्त मोहिम चालवण्यात आली ती सुद्धा याच जवळील लोकांमुळे यशस्वी झाली नाही. तसेच दाऊदच्या (Dawood Ibrahim) सरेंडरची मागे चर्चा होती, फक्त त्याची अट अशी होती की आर्थर रोड जेलमध्ये त्याला थर्ड डिग्री दिली जाऊ नये. मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) या मागणीला मंजुरी दिली नाही. कारण दाऊद पुन्हा भारतात आल्यास त्याला सहकार्य करणाऱ्या नेत्यांचे नावे उघड झाली असती, असे रॉ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.