जेव्हा पक्ष कमजोर होतो तेव्हा Sharad Pawar काँग्रेसमध्ये जातात; फडणवीसांचा हल्लाबोल

134

आधीच तुम्ही बुडाले आहात आणि आता तुम्ही बुडत्या जहाजात जात आहात. पवारांनी (Sharad Pawar) पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवल्याचे सांगितले. पवारांची राजकीय कारकिर्द पाहिली, तर ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला, त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि मग काँग्रेसमधून बाहेर पडले. १९७७ पासून ते आजपर्यंत आपण पाहिले असेल जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलिन होतात, मग ते बाहेर पडतात. त्यामुळे त्यांनी असे स्टेटमेंट देणे याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहितेय त्यांना समजतोय, तो संदर्भ मोदींचा होता. ही ऑफर नाही, असेही ते पुढे म्हणाले.

४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलिन होण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात सामील व्हा, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) उद्देशून केले होते. त्यांच्या या विधानानंतर नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ऑफर दिल्याची चर्चा झाली. परंतु, ही ऑफर नसून हा सल्ला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही. हा सल्ला आहे. मोदी म्हणाले बारामतीच्या निवडणुकीनंतर पवारांच्या लक्षात आले की बारामतीची सीट अजित पवारांकडे चालली आहे. तेव्हा शरद पवारांनी सांगितले की ४ जूननंतर क्षेत्रीय पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पवारांना समजतो. त्यापुढे नरेंद्र मोदी असे म्हणाले की, काँग्रेस हे बुडते जहाज आहे. काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात यावे, तर तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील. याचा अर्थ ऑफर होत नाही. याचा अर्थ सल्ला होतो. त्यांना सल्ला दिलाय, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी केले.

(हेही वाचाShirur LS Constituency : शिरुरमध्ये उलटे वारे, ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास नसलेल्या कोल्हेंचाच प्रचार करतात उद्धव आणि आदित्य)

नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले?

दरम्यान, नंदूरबारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार (Sharad Pawar) यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.