Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार; शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार; शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले

379
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार; शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार; शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव मिळाले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आले आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झालेला नाही.

(हेही वाचा – DCM Ajit Pawar यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे)

पवार गटाने दिलेले ३ पर्याय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला (Election Commission Of India) काही पर्याय द्यायचे होते. 6 फेब्रुवारी रोजी हे शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावे दिली होती.

७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ म्हणजे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव त्यांना दिले आहे. जुने राष्ट्रवादी कॉंग्रेस हे नाव आणि नवीन नावात शरद पवारांचे स्वतःचे नाव असे मिश्रण करण्यात आले आहे.

वटवृक्ष चिन्हासाठी पवार आग्रही

शरद पवार गटाला पक्षचिन्हासाठीही पर्याय द्यायचे आहेत. शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. (Sharad Pawar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.