Sharad Pawar :सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते

शपथविधीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे .

148
Sharad Pawar :सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते
Sharad Pawar :सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते

राष्ट्रवादी नक्की कोणाची यावर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटात वाद सुरूच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचं कवित्व अजूनही संपलेलं नाही. वरचेवर या शपथविधीशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या शपथविधीच्या मागचं गूढ अधिकच वाढत आहे. या शपथविधीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे . शरद पवार यांच्या संमतीनेच भाजप-राष्ट्रवादीच्या युतीचं ठरलं होतं. पण पवारांनी माघार घेतली. आमच्याशी विश्वासघात केला. मात्र सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते, त्यानंतर पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

शरद पवार म्हणाले होते की, मी आज इथं माफी मागायला आलोय. माझा अंदाज फारसा चूकत नाही, परंतु इथं माझा अंदाज चुकला असं म्हणाले होते. त्यावर भुजबळांनी पलटवार करताना सांगितले की, चुकलो म्हणजे काय, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता असताना मी तुमच्यासोबत आलो, तेव्हा कुणी तुमच्याबरोबर नव्हते. मी मजबुतीने उभा राहिलो. मी सांगू का माझी चूक झाली, अशा चूका मीपण खूप केल्या असं त्यांनी म्हटलं.भुजबळांचे गौप्यस्फोट २०१४ ला वेगवेगळ्या निवडणुका लढण्याचे आधीच ठरले होते, भाजपानं शरद पवारांना सांगितले की, आम्ही स्वतंत्रपणे लढतो, तुम्ही काँग्रेसला सोडा, मग ४ पक्ष स्वतंत्र लढले. निवडणुकीनंतर काही दिवस भाजपा सरकार चालवेल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल असं आधीच ठरले होते ही पवारांची रणनीती होती. अशी माहिती ही भुजबळांनी बोलताना दिली.

२०१७ मध्ये राष्ट्रवादी-भाजपात चर्चा झाली, कुणाला किती मंत्रिपदे, किती जागा, पालकमंत्री, महामंडळे किती सगळे काही ठरले. त्यानंतर मग शरद पवारांनी भाजपाला अट घातली की, आम्ही तुमच्यासोबत येतो, परंतु शिवसेना नको. त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वीही भाजपासोबत चर्चा झाली होती.शरद पवार, प्रफुल पटेल, अजित पवार, जयंत पाटील ही मंडळी भाजपासोबत चर्चा करत होती. शिंदे येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही हीच मंडळी भाजपासोबत चर्चा करत होती.

ते काही अजित दादांचे बंड नव्हते

अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला, भाजपासोबत चर्चेवेळी अजित पवार होते, अजित पवारांनी शब्द दिला होता, तो शब्द पूर्ण करण्यासाठी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला. ते बंड नव्हते तर आधी ठरले होते.अजित पवारांनी धोका दिला नाही तर अजित पवारांनी शब्द पूर्ण केला. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केले ते सत्य आहे. २०१९ ला पहाटेचा शपथविधीवेळी कुणी धोका दिला हे समोर आहे. अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही. जे मतभेद निर्माण झालेत ते मिटतील असं नाही.

शिवसेनेला वगळून सरकार बनवण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी भाजपने शरद पवार यांना विचारलं आमच्यासोबत नक्की राहणार का? तेव्हा शरद पवार यांनी हो म्हणून सांगितलं. त्यानंतर भाजपने अजित पवारांना हाच प्रश्न विचारला. तेव्हा मै अजित पवार बोल रहा हूँ, जबान देता हूँ, असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं. त्यानंतर भाजप राष्ट्रवादीचं सरकार बनणार होतं. पण ऐनवेळी शरद पवारांनी नकार दिला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

(हेही वाचा : Shivsena Dasara Rally : शिवाजी पार्कवर अखेर ठाकरेंचीच तोफ धडाडणार)

दुसरा गौप्यस्फोट
यावेळी भुजबळ यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना भाजपसोबत युती करण्याचा राष्ट्रवादीने निर्णय घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोटही त्यांनी केला. मंत्रीपदं, खाती वगैरे सर्व गोष्टी ठरल्या होत्या. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजित पवार यांनी चर्चा करायचंही ठरलं. कुठे जायचं वगैरे ठरलं. विमान तयार होतं. निघायच्यावेळी जयंत पाटील शरद पवार यांना भेटायला गेले. आम्ही जातो म्हणून त्यांनी पवारांना सांगितलं. त्यावेळी पवार यांनी जाऊ नको म्हणून सांगितलं, असं सांगतानाच भाजपसोबत जायचं नव्हतं तर शरद पवार वारंवार भाजपशी चर्चा का करत होते? असा सवाल भुजबळ यांनी यावेळी केला.

फडणवीस खरंच बोलले
त्यानंतर शरद पवार हे दिल्लीत गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. मी तुमच्यासोबत येण्याचा शब्द दिला होता. पण आता ते शक्य नाही असं पवारांनी मोदींना सांगितलं होतं, असं सांगतानाच अजित पवार यांनी धोका दिला नाही. अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेऊन बंड केलं नाही. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. शरद पवारांनी धोका दिला की नाही हे तुम्ही ठरवा. पण देवेंद्र फडणवीस यांचं विधान खरं आहे एवढंच मी सांगू शकतो, असं म्हणत भुजबळ यांनी शरद पवार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

तीच संधी अजितदादांनी साधली
राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचं ठरलं होतं असं भुजबळ यांनी सांगितलं. मात्र, पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांची संमती नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी सरकार बनवण्याआधीच माघार घेतली होती. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीला पवारांची सहमती नव्हती. त्यावेळी शरद पवार यांची उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही चर्चा सुरू झाली होती. किती मंत्री आणि खाती घ्यायची हे सुद्धा ठरलं होतं. पण त्या बैठकीत खरगे आणि पवारांचं वाजलं. तेव्हा पवार रागाने बाहेर पडले. तिच संधी साधून अजितदादांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रपती राजवट उठवली आणि शपथविधी झाला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.