राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गट मुंबईत विधानसभेला ६ पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई (Mumbai) अध्यक्षा राखी जाधव (Rakhee Jadhav) यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात माहिती दिली. मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा,अणुशक्ती नगर-कुर्ला, दिंडोशी-वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर-मानखुर्द यांपैकी किमान ६ जागा शरद पवार गट मागण्याची शक्यता आहे. राखी जाधव लवकरच शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर करणार आहेत.
(हेही वाचा – Swaminarayan Temple Pune : अतिशय भव्य आहे पुण्यातील स्वामीनारायण मंदिर; जाणून घ्या मंदिराबद्दल महत्त्वाच्या गोष्टी!)
समन्वय चांगला करणार
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर सर्वच पक्ष आता विधानसभा (Vidhansabha Elections) सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात झालेला उशीर महायुतीसाठी डोकेदुखी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरच जागावाटप करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे. महाविकास आघाडीच्याही जागा वाढल्यामुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांचा आणखी समन्वय साधत आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्लॅन आहे.
राज्यात 100 जागा लढवण्याची तयारी सुरू
यापूर्वीच, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत, निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य असा क्रम महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात राहील, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीनेही राज्यात १०० जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे, त्यात मुंबईतील ६ पेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community