राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब (Sharad Pawar) यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, राज्यात पावसाची स्थिती गंभीर असून १९ जिल्ह्यातील ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ सोळा तालुक्यात आहे. म्हणजेच ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता असल्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. (Sharad Pawar)
(हेही वाचा – Pravara River मध्ये बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण)
राज्यात २ हजार ९२ मंडळ असून पंधराशे मंडळात दुष्काळ राज्यात जाहीर करण्यात आला आहे. यात मराठवाडा आणि पुण्यातील काही भागात गंभीर परिस्थिती आहे. देशभरात सर्वाधिक धरणे राज्यात असताना देखील पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असेही शरद पवार म्हणाले.
मराठवाड्यात ४० महत्वाची धरणे असताना या विभागात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागासह अशीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांची आहे. छत्रपती संभाजी नगरला ८१ लघु प्रकल्प आहेत इथे फक्त सहा टक्के पाणी शिल्लक आहे. पुण्यामध्ये पन्नास प्रकल्प आहेत या भागात फक्त २४ टक्के पाणी शिल्लक असल्याचे पवार म्हणाले. (Sharad Pawar)
(हेही वाचा – Pune Hit And Run Case: काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ‘पब’विरोधी की बाजूने?)
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, कृषीमंत्र्यांचा बीड जिल्हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना कृषी मंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या कालच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे. या सगळ्याकडे सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणे गरजेचे असे शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community